लेझीमच्या तालावर अकलूजचा विजयोत्सव! विजय चौकात २० व्या भव्य लेझीम स्पर्धा २०२६चे दिमाखदार उद्घाटन

0
60
लेझीमच्या तालावर अकलूजचा विजयोत्सव! विजय चौकात २० व्या भव्य लेझीम स्पर्धा २०२६चे दिमाखदार उद्घाटन


अकलूज  | लेझीमच्या गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात विजय चौक परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. सहकार महर्षी शंकरराव (काकासाहेब) नारायणराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त, संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘२० व्या भव्य लेझीम स्पर्धा २०२६’ चे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या सोहळ्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री. संग्रामसिंह मोहिते-पाटील, नूतन नगरसेवक श्री. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील तसेच रेश्मा अडगले यांच्या हस्ते करण्यात आले.
अकलूजची लेझीम ही केवळ परंपरा नसून जागतिक ओळख ठरली आहे. आदरणीय श्री. जयसिंह (बाळदादा) मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजच्या लेझीमने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवत इतिहास घडवला आहे. हा गौरवशाली वारसा पुढे नेणाऱ्या सर्व सहभागी शाळा, संघ व वादक कलाकारांचे यावेळी विशेष कौतुक करून स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, अकलूज नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये आदरणीय श्री. विजयसिंह (मोठेदादा) मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पॅनलला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळाच्या वतीने सर्व नूतन नगरसेवक-नगरसेविका व नगराध्यक्षा रेश्मा अडगले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले अकलूजचे ग्रामस्थ सहभागी झाले होते. लेझीमच्या तालावर साजरा झालेला हा सोहळा अत्यंत चैतन्यमय आणि प्रेरणादायी ठरला.