
वडेट्टीवार म्हणाले, ‘अजित दादा कधीच खूश राहत नाही. ते नेहमीच नाराज असतात. त्यांच्या मनाप्रमाणे झाले की ते खूश असतात. ‘हम करे सो कायद्या’, अशी त्यांची भूमिका असते. सध्याच्या तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना वाटा मिळत नाही, असं वाटतं. आता तर तिजोरीची चावीच त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते दुसऱ्याकडे तक्रार का करत आहेत? दादांनी आता त्यांची धमक दाखवावी… महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना ते धमक दाखवून तिजोरी साफ करत होते. आता महायुती सरकारमध्येही धमक दाखवावी. निधी मिळत नाही, असं रडत बसण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची दादांमध्ये हिंमत आहे का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.






