Ajay Devgn: अजय देवगणसाठी मराठी माणूस मागतोय भीक, काय आहे प्रकरण?

0
15
Ajay Devgn: अजय देवगणसाठी मराठी माणूस मागतोय भीक, काय आहे प्रकरण?


सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा नाशिकमधील असल्याचे म्हटले जात आहे. एक व्यक्ती दुचाकीवर बसून ‘अजय देवगणसाठी भीक मांगो आंदोलन’ करत आहे. “मी आज ऑनलाइन गेम्सच्या विरोधात आंदोलन करत आहे. ऑनलाइन गेम्स आपल्या पिढ्या बरबाद करत आहेत. या लोकांना देवाने भरपूर दिलंय, पण तरीही ते अशा जाहिराती करून आपल्या पिढ्या खराब करत आहेत. त्यामुळे मी या भीक मांगो आंदोलनातून मिळणारे पैसे अजय देवगणला पाठवणार आहे. तसेच गांधीगिरी स्टाइलने त्याला अशा जाहिराती न करण्याची विनंती करणार आहे. तुला पैशांची आवश्यकता असेल तर मी पुन्हा भीक मागेन आणि तुला पैसे पाठवेन पण अशा जाहिराती करू नकोस,” तो असे म्हणाला आहे.



Source link