
अजय देवगणची मोठी मुलगी न्यासा ही सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. कधी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या वागणुकीमुळे. नुकताच तिचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. रविवारी न्यासा ही तिचा जवळचा मित्र ओरीसोबत एका पार्टीला गेली होती. न्यासा गाडीतून उतर असताना अचानक बॉडीगार्ड तिच्या समोर येतो. दोघांची टक्कर होते. याचा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.






