
या घटनेची माहिती मिळताच अहमदनगर पोलिस पथक तसेच तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने खड्ड्यात बुडालेल्या सहा जणांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या व्यक्तींची नावे समोर आली असून माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे, बाबासाहेब गायकवाड अशी त्यांची नावे असून एकाचे नाव समजू शकलेले नाही.





