Agniveer: शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत! राहुल गांधींच्या दाव्यावर अग्निवीर अक्षय गवतेच्या वडिलांनी सांगितलं सत्य

0
21
Agniveer: शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत! राहुल गांधींच्या दाव्यावर अग्निवीर अक्षय गवतेच्या वडिलांनी सांगितलं सत्य


१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (१ जुलै) लष्कराच्या अग्निवीर योजनेवरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेत शहीद दर्जा दिला जात नाही,शहीद झालेल्या अग्निवीर जवानांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक भरपाई दिली जात नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. यावेळी त्यांनी बुलढाण्यातील शहीद अग्निवीर अक्षय गवते यांचा उल्लेख केला. यानंतर बुलढाण्यातील शहीदाच्या कुटूंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे.



Source link