Aditya Roy Kapur: ‘आशिकी ३’मध्ये आदित्यऐवजी कार्तिक आर्यनची वर्णी! प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणतो…

0
31
Aditya Roy Kapur: ‘आशिकी ३’मध्ये आदित्यऐवजी कार्तिक आर्यनची वर्णी! प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणतो…


Koffee with Karan 8 Guest Aditya Roy Kapur: सध्या करण जोहर याचा ‘कॉफी विथ करण’ या शोचा आठवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसत आहेत. नुकत्याच एक भागात अभिनेता आदित्य रॉय कपूर याने करण जोहरच्या भन्नाट प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी आदित्य रॉय कपूर याच्यासोबत अर्जुन कपूर देखील या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी करण जोहर याने आदित्य रॉय कपूर याला ‘आशिकी ३’ या चित्रपटाविषयी प्रश्न विचारले. अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी ‘आशिकी २’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, आता ‘आशिकी ३’ या चित्रपटात कार्तिक आर्यन याने आदित्यला रिप्लेस केले आहे. यावर आता आदित्यने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.



Source link