
Adipurush Box Office Collection: बॉलिवूड स्टार्स प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज होऊन आता एक आठवडा झाला आहे. एकीकडे या चित्रपटावर टीकेची झोड उठत आहे. तर, दुसरीकडे या सगळ्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील होत आहे. आता या चित्रपटाचे सातव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. मात्र, या कलेक्शनचे आकडे अतिशय निराशाजनक आहे. ‘आदिपुरुष’ने रिलीज झाल्यानंतर जगभरातील बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग मिळवली होती. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्येच जगभरात ३०० कोटींचे कलेक्शन केले. पण, रिलीजच्या दोन दिवसानंतरपासून ‘आदिपुरुष’ची अवस्था बिकट झाली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा व्यवसाय सातत्याने मंदावत चालला आहे.







