फलटण शहरात चायनीज मांजा विक्री करण्यावर कारवाई ; फलटण पोलीस स्टेशन कडून

0
1
फलटण शहरात चायनीज मांजा विक्री करण्यावर कारवाई ; फलटण पोलीस स्टेशन कडून

फलटणः बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे दरवर्षी लहान मोठ्या पक्ष्यांना पंखाना गंभीर दुखापत होऊन आपला जीव गमवावा लागतो. पक्षांप्रमाणे सायकलस्वार, शाळकरी मुले, मुली, दुचाकीस्वार तसेच दुचाकीवर पुढे बसवलेली लहान मुले यांना चायनीज मांजा कापून गंभीर दुखापत होऊन काहींना मागील काळात आपला जीव गमावा लागला आहे

नेचर आणि वाईल्ड लाईफ फेअर सोसायटी फलटण व मुधोजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या वतीने फलटण शहरामध्ये काही दिवसापूर्वी प्रभात फेरी काढून चायनीज मांजा ची विक्री व वापर पतंग उडविण्यासाठी होऊ नये . यासाठी समाज प्रबोधन करण्यात आले होते . फलटण शहर व तालुक्यात चायनीज मांजा विक्री व वापर करण्यावर कारवाई केली जाणार असे फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी प्रसारमाध्यमांना कळविले होते . तसेच फलटण शहर पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी बोलताना यांना सांगितले की चायनीज मांजा बरोबर समाजातील असणारे वाईट प्रवृत्ती विरोधात सुद्धा आपण जनजागृती केली पाहिजे . या प्रमाणे हेमंतकुमार शहा यांनी काल नागपंचमीच्या दिवशी समाजातील माणसात असणाऱ्या वाईट प्रवृत्ती विरोधात कारवाई केली ‘ कोणत्याही व्यक्ती विरोधात नाही . पैशाच्या हव्यासापोटी चायनीज मांजा ची विक्री करणाऱ्यावर फलटण शहर पोलीसांनी तत्काळ कारवाई केली . मा . जिल्हाधिकारी सो . सातारा यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करण्यावर कायदेशीर कारवाई केली यामध्ये ९ I ८ । २०२४ रोजी सकाळी ११. ४५ वा . मेटकरी गल्ली फलटण येथे शाहरूख दस्तगीर काझी वय २७ वर्षे यांच्यावर कारवाई करत त्याच्याकडून प्रत्येकी ७०० रु किंमतीचे १५ रोल , ९०० रु किंमतीचे ०३ रोल असे एकूण १३२०० % रु किंमतीच्या नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवलेल्या मिळून आला

तसेचउंब्रेश्वर चौक, मलठण, ता फलटण जि सातारा येथे चौकात  १) रेवणसिध्द अतुल यादव वय २0 वर्षे, रा. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा, २) तेजस राहुल कांबळे वय १९वर्षे, रा. उंब्रेश्वर चौक, मलठण, ता. फलटण, जि. सातारा यांचे ताब्यात ५०० रु किंमतीचा 0१ रोल नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवलेला मिळुन आला म्हणुन त्यांचे विरुद्ध सरकार तर्फे मा. जिल्हाधिकारी सो. सातारा यांचे बंदी आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन भा.न्या.सं. कलम २२३,३ ( ५) प्रमाणे सरकारतर्फे कायदेशिर फिर्याद आहे.