Accident News | प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन पडली खड्ड्यात; 4 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
Accident News | प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन पडली खड्ड्यात; 4 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)


प्रवाशांनी भरलेली  बस अनियंत्रित होऊन पडली खड्ड्यात; 4 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

तामिळनाडूमध्ये मंगळवारी रात्री प्रवाशांनी भरलेल्या बसचे नियंत्रण सुटले आणि ती खोल दरीत कोसळली. या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला तर २० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

तामिळनाडूमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात मंगळवारी रात्री मोठी दुर्घटना (Tamilnadu Accident News) घडली. प्रवशांनानी भरलेली बस अनियंत्रित होऊन थेट दरीत कोसळली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात केले.

हे सुद्धा वाचा

 सालेमला जात होती बस

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली ही बस येरकौडहून तामिळनाडूतील सेलमला जात होती. मंगळवारी रात्री एक खासगी बस खड्ड्यात पडली. बसमध्ये एकूण 56 प्रवासी होते. एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि वाहन बाजूच्या भिंतीला धडकली. पण वाहनाचा वेग थोडा जास्त असल्याने बस भिंतीला धडकून खाली खड्ड्यात पडली.






Source link