Abhishek Ghosalkar: आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा, अभिषेक घोसाळकर यांच्या वडिलांची विनंती

0
15
Abhishek Ghosalkar: आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा, अभिषेक घोसाळकर यांच्या वडिलांची विनंती


पुढे विनोद घोसाळकर म्हणाले की, “माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे. ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर आमची तक्रार नोंदवा, पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे.”



Source link