
Abhishek ghosalkar murder case : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची यावर्षी ८ फेब्रुवारी रोजी फेसबूक लाइव्ह करत मॉरिस नोरोन्हा याने हत्या केली होती. याहत्येप्रकरणी आज मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी घोसाळकरांच्या हत्येसंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, असे आदेश हायकोर्टाने (Mumbai High Court) पोलिसांना दिले आहेत. दरम्यान आरोपपत्रात दाखल करण्यात आलेलं सर्व कुटुंबियांना दिल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. तसेच हत्या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज गुगल टाईमनुसार ताब्यात घेतल्याचंही पोलिसांनी (Mumbai Police) स्पष्ट केलं आहे.







