Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाच्या तपासावर वडिलांची नाराजी, पत्नी म्हणाली माझ्याही हत्येचा कट..

0
17
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाच्या तपासावर वडिलांची नाराजी, पत्नी म्हणाली माझ्याही हत्येचा कट..


विनोद घोसाळकर यांनी म्हटले आहे की, या घटनेनंतर पार्थिवाची अग्नि शांत होण्याअगोदर देवेंद्र फडणवीस, उदर सामंत व छगन भुजबळ यांनी बेजबाबदार विधाने करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात ली. त्यावर गाडीखाली श्वान आला तरी विरोधक राजीनामा मागतील, अशी खोचक प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती. तर हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद असल्याचे सामंत म्हणाले होते. आपापसातील भांडणात कोणी गोळीबार करत असेल तर पोलीस आणि मंत्री काय करणार असा वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केलं होतं.



Source link