
Abhishek Bachchan Praises Wife : बॉलिवूडचा ज्युनिअर बच्चन म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चन याचा ‘आय वॉन्ट टू टॉक’ हा चित्रपट एका धाडसी बापाची कहाणी सांगणारा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिषेकने मुलांच्या आयुष्यातील त्यांच्या आई आणि वडिलांच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. यावेळी त्याने आई जया बच्चन आणि पत्नी ऐश्वर्याचे कौतुक केले. वडील मुलांसाठी खूप काही करतात, पण त्या गोष्टी कशा व्यक्त कराव्यात हे त्यांना कळत नाही, असेही तो यावेळी म्हणाला.