Abhishek Aishwarya News: घटस्फोटाची चर्चा करणाऱ्यांना चपराक! अंबानींच्या सोहळ्यात बच्चन कुटुंबाची धमाल; पाहा Viral Video

0
14
Abhishek Aishwarya News: घटस्फोटाची चर्चा करणाऱ्यांना चपराक! अंबानींच्या सोहळ्यात बच्चन कुटुंबाची धमाल; पाहा Viral Video


अभिषेक आणि ऐश्वर्याने विभक्त झाल्याच्या अफवा फेटाळल्या!

अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या समारंभात एकत्र येण्यापासून ते एकत्र सेलिब्रेशनला हजर राहण्यापर्यंत, अभिषेक आणि ऐश्वर्याने पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. याआधी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे वैवाहिक जीवन वादात अडकले होते. ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत तिच्या आईच्या घरी शिफ्ट झाल्याचे देखील म्हटले जात होते. मात्र, या चर्चेदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक अनेकदा एकत्र दिसले आहेत आणि त्यांच्या विभक्त होण्याच्या या चर्चा केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याचा डेब्यू चित्रपट ‘द आर्चीज’च्या स्क्रिनिंगदरम्यान देखील ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले होते.



Source link