
प्रतिक पुढे म्हणाला की, ‘या गाण्याची खासियत म्हणजे, या गाण्यात आधीच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. आणि दुसरं म्हणजे हे गाणं आर्या आंबेकरनं गायलं आहे. तिनं या गाण्याला आणखी खास बनवलं आहे. आर्या आंबेकरनं हे गाणं खूप गोड गायलं आहे. डॉ. विनायक पवार यांनी शब्दबद्ध सुद्धा सुरेख केलं आहे. संजीव-दर्शन यांचं संगीत आहे. सर्व कानसेन रसिक प्रेक्षकांना हे गाणं अगदी भावेल याची मला खात्री आहे.’