
आजच्या भागात आरोही पोलीस स्थानकात जाऊन त्याच मुलांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगणार आहे. आजपर्यंत एवढा मोठा गुन्हा करुनही उघडपणे फिरणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आता आरोहीने हिच ती मुले असल्याचे सांगितल्यावर त्यांना शिक्षा होणार आहे. या सगळ्यात सुलेशा ताई, संजना, अनघा आरोहीच्या पाठिशी खंभीरपणे उभ्या राहतात. कांचन आजी मात्र काचमुचतच या सगळ्यावर बोलताना दिसतात.






