Aai Kuthe Kay Karte 4th March: मायामुळे अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात पडणार फूट?

0
13
Aai Kuthe Kay Karte 4th March: मायामुळे अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात पडणार फूट?


Aai Kuthe Kay Karte update: गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेत मनू आणि मायाची एण्ट्री झाल्यापासून मालिका रंजन वळणावर पोहोचली आहे.माया मनूला घेऊन जाण्यासाठी केळकरांच्या घरात राहात आहे. तिला मनूच्या मनात वेगळी जागा निर्माण करायची आहे. आता मायाला या सगळ्यात यश मिळणार का? असा प्रश्न पडला आहे. अशातच मनू, माया आणि आशुतोष हे शाळेच्या एका कॅप्मसाठी गेले आहेत. अरुंधतीला मात्र, अनघाच्या आजारामुळे तेथे जाता येत नाही. पण या सगळ्याचा परिणाम अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यावर होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



Source link