
संजना ही तिच्यासोबत सुरु असलेल्या गोष्टींमुळे चिडलेली असते. राधिकाने तिच्या इंस्टीट्यूटमध्ये पैसे टाकले असले तरी ती वेगळी खेळी करताना दिसते. शिक्षण म्हणून संजना एकटीच तिच्या इन्स्टीट्यूटमध्ये असते. या सगळ्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर होत आहे. तिचे डोक दुखत आहे. तेवढ्यात अनिरुद्ध तेथे येतो आणि तिच्या डोक्याला बाम लावतो. तो संजनाला विचारतो तू हे सगळं माझ्यासाठी का करते. तेव्हा संजना सांगते की तिचे आजही अनिरुद्धवर प्रेम आहे. आता अनिरुद्ध आणि संजना यांच्या नात्यात जवळीक निर्माण होणार की पुन्हा अनिरुद्ध कारण काढून संजनाशी भांडणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.








