
यापूर्वी अरुंधती विशाखाला एकटी रडत असताना पाहाते. त्यामुळे तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे अरुंधतीला कळत नाही. विशाखाला विचारले असता ती उडवाउडवीची उत्तरे देते. नंतर अनिरुद्ध ईशाशी किती चुकीचा वागत आहे हे ती सांगते.अरुंधती म्हणते की, बऱ्याच पुरुषांना आपला हळवेपणा समोरच्यांना दाखवणं म्हणजे आपली हार वाटते. समोरच्याला माफ करणं म्हणजे स्वत:चा कमीपणा वाटतो. म्हणून स्वत:भोवती कठोरपणाचं कवच तयार करतात, असंच अनिरुद्धंचं झालं आहे. तेव्हा विशाखा म्हणते की सगळ्या पुरुषांना आपल्या माणसांपेक्षा स्वत:चा अहंकार का मोठा वाटतो? अरुंधतीला नेमकं कळत नाही ‘सगळ्या पुरुषांबद्दल’ म्हणजे विशाखा नेमकं कोणाबद्दल बोलते आहे. मात्र, नंतर तिने घटस्फोटाबाबत सांगितल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो.