
पुढे सतीश राजवाडे म्हणाले की, “या मालिकेला नावे ठेवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की मालिका प्रगल्भ करण्यासाठी आम्हाला हे वळण आणणे गरजेचे होते. आपल्याला आई असते, पण आईला जेव्हा आईची गरज असते तेव्हा कोण असते? आपल्या सगळ्यांना गरज असते तेव्हा आई असते, पण आईला जेव्हा कोणाची गरज असते तेव्हा कोणीच नसते. त्यामुळे प्रेक्षकांनी आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही जे काही करतोय ते तुम्ही हा प्रवास पाहून झाल्यानंतर सांगा बरोबर आहे की चूक आहे ते”








