
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील ईशाचे लग्न हा विषय चर्चेचा विषय ठरत आहे. ईशा आणि अनिशच्या लग्नाला आता अनिरुद्धने होकार दिला आहे. त्यानंतर ईशा खूश झाली आहे. ईशा तिच्या साखरपुड्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते. मात्र, अरुंधती अगदी घरगुतीपद्धतीने करायचा म्हणते. यावरुन अरुंधती आणि ईशामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते.






