
बाबांनी अनिशच्या आईबाबांचा अपमान केला. माझ्या आणि अनिशच्या लग्नाला नकार दिला. सध्या माझ्यापेक्षा तुमच्या भावना महत्त्वाच्या नाहीत. मला ना लाज वाटते तुम्हाला वडील म्हणायची असे ईशा म्हणते. तेवढ्यात अरुंधती तिला थांबवते. ‘काही तरी भान ठेव, ते तुझे वडील आहेत’ असे अरुंधती म्हणते. आता ईशा परत घरी जाणार का? की ईशा कायमची अरुंधतीकडे राहाणार? अनिरुद्ध त्या दोघांच्या लग्नाला तयार होणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.






