
अभिनेते आदेश बांदेकर यांचा जन्म १८ जानेवारी १९६६ रोजी अलिबागमध्ये झाला. मूळचे अलिबागचे असणारे आदेश बांदेकर, कुटुंब मुंबईत स्थायिक झाल्याने मुंबईकर झाले. त्यांचं बालपण मुंबईतल्या लालबाग परळ या भागामध्ये गेलं. आदेश बांदेकर हे त्यांच्या तीन भावंडांमध्ये मधले होते. लहानपणापासूनच खोडकर असलेल्या आदेश बांदेकर यांना अभ्यासातही फारसा रस नसायचा. मात्र, कलेशी संबंधित अनेक गोष्टींची त्यांना मनापासून आवड होती. शाळा आणि चाळीत असताना तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये आदेश बांदेकर आवर्जून सामील व्हायचे. नाटुकली असो वा डान्स आदेश नेहमीच सतेज गाजवायचे. शाळेतही त्यांनी अनेक बक्षीसं पटकावली होती.








