
‘देवमाणूस’ या गाजलेल्या मालिकेतील एकनाथ गिते, ‘अॅटमगिरी’, ‘वाघेऱ्या’ अशा चित्रपटात काम केलेली श्रेया पासलकर, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेतील त्रिशा कमलाकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. पावसाळी वातावरणात एकांतात असलेलं जोडपं टीझरमध्ये दिसतं आणि पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या संवाद ऐकू येतो. चित्रपटाचा टीझर रोमँटिक असल्यानं या चित्रपटाविषयी आता उत्सुकता वाढली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गेट टुगेदर’ या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाची पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांचे आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं असून, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, जावेद अली, गायिका आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे यांनी चित्रपटातली सुमधुर गाणी गायली आहेत.






