Friday, August 21, 2026
Homeमनोरंजनउन्हाळ्यात गॅस-ॲसिडीटीचा त्रास होतोय? ‘हे’ सोपे उपाय करुन पाहा, अपचनाचे त्रास लगेच होतील...

उन्हाळ्यात गॅस-ॲसिडीटीचा त्रास होतोय? ‘हे’ सोपे उपाय करुन पाहा, अपचनाचे त्रास लगेच होतील कमी

उन्हाळ्यात गॅस-ॲसिडीटीचा त्रास होतोय? ‘हे’ सोपे उपाय करुन पाहा, अपचनाचे त्रास लगेच होतील कमी

[ad_1]

Remedies for Bloating and Acidity: वाढत्या उन्हामुळे आपल्याला डिहायड्रेशन, अपचन, गॅस यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. मसाल्याचे, तेलाचे पदार्थ खाल्ल्याने पोट फुगल्यासारखे किंवा गच्च झाल्यासारखे वाटते. चुकीच्या आहारामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उदभवतात. त्यातील सामान्य समस्या म्हणजे पोट फुगणे. यालाच ‘ब्लोटिंग’, असेही म्हणतात. ब्लोटिंगमध्ये पोटात जास्त गॅस जमा होतो आणि पोट फुगू लागते. अनेक वेळा जास्त खाल्ल्याने गॅस, पोट फुगणे, आंबट ढेकर येणे इत्यादी समस्या उद्भवतात. गॅसच्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी दिल्ली येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग सल्लागार डॉ. विकास जिंदाल यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डॉक्टर सांगतात, “आजकाल चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे आणि जंकफूडच्या अतिसेवनामुळे शरीराला आवश्यक तसे पोषण मिळत नाही. जास्त प्रमाणात जंक फूड किंवा मसालेदार व तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. बदललेली जीवनशैली, एकाच ठिकाणी तासन् तास बसून राहणे, शारीरिक हालचालींतील घट यांमुळे पोट फुगणे, गॅसेस, मळमळ व छातीत दुखणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. पोटात गॅस तयार झाल्यामुळे अनेकदा पोटात जडपणा, वेदना, सूज व बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होतात.” त्यावरील काही उपाय डॉक्टरांनी सांगितले आहेत. या उपायांच्या माध्यमातून तुम्ही पोट फुगण्याच्या समस्येतून सुटका करून घेऊ शकाल.

  • चहा-कॉफीचे सेवन अति प्रमाणात केल्याने पोटात गॅस तयार होऊ शकते त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ खाणं पिणं टाळा.
  • फुलकोबीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने पचनसंस्थेवर दबाव येतो. त्यामुळे व्यक्तीला पोट फुगणे, गॅस आणि जुलाबाची समस्या होऊ शकते. आधीच पचनाची समस्या असेल तर फुलकोबीचे सेवन मर्यादित प्रमाणात किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच करा.
  • काही लोकांना रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यानेही गॅस होऊ शकतो. या फळांमध्ये फ्रॅक्टोज आणि फायबरचे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे पोट फुगणे आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
  • कच्च्या भाज्या, विशेषत: काकडी व कांदे यांसारख्या उच्च फायबर सामग्री असलेल्या भाज्या खाल्ल्यानेही गॅस होऊ शकतो.

पोट फुगणे आणि गॅसची समस्या दूर करण्याचे उपाय :

  • जास्त तळलेले वा तेलकट पदार्थ खाणे टाळा.
  • मसालेदार किंवा कॅफिनयुक्त पदार्थ रात्री खाऊ नयेत.
  • पुरेशा प्रमाणात हायड्रेटेड राहून, अन्न पूर्णपणे चघळणे आणि प्रो-बायोटिकसमृद्ध पदार्थांचा समावेश करून, संपूर्ण पाचनयुक्त आरोग्याला चालना देण्याचा प्रयत्न करा.
  • सकस आहार घ्या आणि व्यायाम करा.
  • जर आपल्या पोटात गॅस झाला असेल, तर शरीराची हालचाल होऊ द्या.
  • ब्लोटिंगच्या समस्येमुळे वैतागले असाल, तर कोमट पाणी किंवा हर्बल टी प्या.

समस्या उद्भवल्यास आपल्या डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या, असेही ते नमूद करतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments