Monday, September 21, 2026
Homeमनोरंजनउन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी; ढोबळी मिरची, फ्लॉवर, घेवडा, मटारच्या दरात वाढ

उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी; ढोबळी मिरची, फ्लॉवर, घेवडा, मटारच्या दरात वाढ

[ad_1]

पुणे : उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. ढोबळी मिरची, फ्लॉवर, घेवडा मटार या फळभाज्यांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १८ ते २० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरातमधून २ ते ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून ३ ट्रक मटार, कर्नाटकातून २ टेम्पो भुईमूग शेंग, तसेच २ टेम्पो पावटा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकातून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ७ ते ८ टेम्पो, शेवगा २ ते ३ टेम्पो, भुईमुग शेंग ५० ते ६० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा १०० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ५० ट्रक बटाट्याची आवक झाली.

कोथिंबीर, मेथीच्या दरात वाढ

कोथिंबीर,मेथीच्या दरात वाढ झाली. कोथिंबिरीला मागणी वाढल्याने दरात वाढ झाली. कोथिंबिरेच्या तुलनेत मेथीची आवक कमी झाली असून, अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. तरकारी विभागात कोथिंबीर एक लाख जुडी, मेथीच्या ३० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १५०० ते २०००, मेथी – १५०० ते २०००, शेपू – ८०० ते १५००, कांदापात- ८०० ते १५००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ३०० ते ७००, पुदिना – ३०० ते ६००, अंबाडी – ४०० ते ६००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ६००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ३००-६००, पालक- ८००- १५००

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments