Tuesday, September 1, 2026
Homeसातारारामराजे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; कार्यकर्त्यांचा जोश अबाधित!

रामराजे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; कार्यकर्त्यांचा जोश अबाधित!

फलटण : गुढीपाडव्याच्या मंगलमय पर्वावर फलटण संस्थांचे अधिपती आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी विलास निवासस्थानी उत्साहाचा माहोल पाहायला मिळाला. सकाळपासूनच कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.

सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या भगिनी माजी नगरसेविका सुभद्राताई नाईक निंबाळकर यांनी औक्षण करून वाढदिवसाचा शुभारंभ केला. यावेळी पुरोहित वर्गाने मंत्रोच्चार करून मंगलमय वातावरण निर्माण केले. या सोहळ्यासाठी फलटण संस्थांचे युवराज, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर लक्ष्मी विलास पॅलेस येथे उभारलेल्या भव्य शामियानात तालुक्यातील हजारो नागरिक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली. संध्याकाळी उत्तर कोरेगाव येथेही त्यांनी नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

रात्री आठ वाजता फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित ‘भीम फेस्टीव्हल 2025’ च्या ‘भीम गीतांचा जल्लोष’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी भीमसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या व भीम गीतांचा आनंद घेतला.

श्रीमंत रामराजे यांना राजकीय, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर त्यांच्या गटातील काही नेत्यांनी विरोधी गटात प्रवेश केला असला, तरी वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा जोश आणि अलोट गर्दी पाहता रामराजे यांची लोकप्रियता अजूनही अबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments