Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रबारामतीत रविवारी जनआक्रोश मोर्चा; स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कुटुंबियांसह समाजबांधवांची...

बारामतीत रविवारी जनआक्रोश मोर्चा; स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कुटुंबियांसह समाजबांधवांची उपस्थिती

बारामती – स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जनआक्रोश मोर्चा रविवारी (दि. ९) काढण्यात येणार आहे. पूर्वी हा मोर्चा शनिवारी (दि. ८) होणार होता, मात्र देशमुख कुटुंबीयांना या आंदोलनात सहभागी होता यावे, यासाठी तो पुढे ढकलण्यात आला आहे.

या मोर्चात स्व. संतोष देशमुख यांचे बंधु, मुलगी आणि संपूर्ण कुटुंब सहभागी होणार आहे. मोर्चा रविवारी सकाळी ८ वाजता कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानातून सुरू होणार असून, नेहमीच्या मार्गाने जात भिगवण चौक येथे समाप्त होणार आहे.

स्व. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बारामती शहरात तीव्र पडसाद उमटले. यामुळे मराठा समाजाने तातडीने जिजाऊ भवन येथे बैठक घेऊन निषेध मोर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.

मोर्चात सर्व जाती-धर्मांचे नागरिक सहभागी होणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. बारामती बंद पाळण्यात येणार असून, सर्वधर्मीय नागरिक या अन्यायाविरोधात एकत्र येणार आहेत.

– साहस Times

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments