
[ad_1]
Bbiwandi Crime News: भिवंडीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात देखील महिला असुरक्षित असल्याचं यामुळे निष्पन्न झालं आहे. एका नवविवाहितेवर सासरे आणि त्याच्या मित्राने जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला असून विवाहितेने तक्रार दिल्यावर नारपोली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन सासरे व त्याच्या मित्राने विवाहितेवर बलात्कार केला. तब्बल १५ दिवस हा प्रकार सुरू होता. आरोपी व त्याचा मित्र घरात झोपले असल्याची संधी साधून घरातून पळून जाऊन विवाहितेने थेट पोलिस ठाणे गाठत. या प्रकरणी तक्रार दिली.
[ad_2]
Source link
