
ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी गौरी जात असलेल्या मार्गावर एक बाईकस्वार समोरून भरधाव वेगात आला आणि त्याने गौरीच्या स्कुटीला समोरून धडक दिली. यामुळे तिची स्कुटी स्लीप झाली. या अपघातामध्ये तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तिला डॉक्टरांनी तीन आठवडे आराम करण्यास सांगितला आहे. तसेच तिच्या स्कूटीचे मोठे नुकसान झाले आहे. चाहते गौरी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.