Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रCyber fraud news: नवी मुंबईकरांनो सावधान, सायबर फ्रॉडमुळे शहरातील नागरिकांनी गमावले तब्बल...

Cyber fraud news: नवी मुंबईकरांनो सावधान, सायबर फ्रॉडमुळे शहरातील नागरिकांनी गमावले तब्बल ४४० कोटी रुपये!

[ad_1]

दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ होत असून वर्षभराच्या काळात नवी मुंबईतील नागरिकांना तब्बल ४४० कोटी रुपये गमवावे लागले आहे. नवी मुंबई पोलिसांनी २०२४ या वर्षभरातील गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये १५० कोटी ९७ लाख रुपयांची नागरिकांची सायबर फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ४१ कोटी ३२ लाख रुपये गोठविण्यात आले असून ६ कोटी ९२ लाख रुपये वसूल करून तक्रारदारांना परत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म (एनसीसीआरपी) पोर्टलवर २९६.७१ कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी २७.५३ कोटी रुपये गोठविण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments