
मालिका, नाटक, सिनेमा, वेबसीरीज, निवेदन, काव्यलेखन, उदयोजिका या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या प्राजक्ता माळी हिने तिच्या सौंदर्यालाही एक सात्विक स्पर्श दिला आहे. योगा, शाकाहार, नियमित व्यायाम यातून बहरलेल्या प्राजक्ताच्या नितळ सौदर्याला नेहमीच दाद मिळते. सौंदर्याविषयीच्या तिच्या टिप्स गाजत असतात. ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह आणि ‘प्राजक्तराज’ हा पारंपरिक दागिन्यांचे व्यवसाय करत प्राजक्ताने वेगळी ओळख निर्माण केली आहे. झी युवा तेजस्वी चेहरा या विभागासाठी झी युवा वाहिनीने प्राजक्ता माळी हिच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि तिच्या चाहत्यांच्या आनंदालाही उधाण आलं.