Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Air Pollution : मुंबईत प्रदूषण रोखण्यासाठी रस्‍त्‍यांवर नव्‍या खोदकामास बीएमसीकडून मनाई

Mumbai Air Pollution : मुंबईत प्रदूषण रोखण्यासाठी रस्‍त्‍यांवर नव्‍या खोदकामास बीएमसीकडून मनाई

[ad_1]

मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे वायू गुणवत्ता स्तर खालावल्‍याचे निदर्शनास आले आहे. वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तातडीच्या, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना लागू केल्या आहेत. याचाच एक भाग म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने चर खोदण्यासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार, चर खोदकामास परवानगी देण्यास तात्‍काळ प्रभावाने मनाई करण्‍यात आली आहे. पाणी पुरवठ्याच्‍या मुख्य जलवाहिनी गळतीचे कामकाज वगळता नवीन चर खोदण्याच्या परवानग्या दिल्या जाणार नसल्‍याचे महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments