Tuesday, September 22, 2026
Homeसातारासामाजिक बांधिलकीसाठी भाजपमध्ये सामील!

सामाजिक बांधिलकीसाठी भाजपमध्ये सामील!

फलटण (मंगळवार पेठ): माजी खासदारांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत काकडे भाजपमध्ये सामील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुदर्शन काकडे यांनी आपल्या मित्रपरिवारासह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमात भाजप युवा नेते अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोक जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, देवा पाटील, तानाजी कदम यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रवेश कार्यक्रमात मंगळवार पेठ फलटण येथील भाग्यवान काकडे कुटुंबीय, तसेच सामाजिक कार्यकर्ते व तरुण नेते यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. यामध्ये भाग्यवान कमलाकर काकडे, आकाश भाग्यवान काकडे, अमित भाग्यवान काकडे, मिलिंद सुदर्शन काकडे, वैभव मारुती मोहिते, विशाल मारुती मोहिते, आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हा प्रवेश सामाजिक बदल व राजकीय स्थैर्यासाठी महत्त्वाचा पाऊल मानला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments