Viral Video : सुट्ट्यांचा आनंद लुटून मुंबईत परतणाऱ्या शाहरुखच्या हातात ‘छोटा पाहुणा’! व्हिडिओ होतोय व्हायरल

0
22
Viral Video : सुट्ट्यांचा आनंद लुटून मुंबईत परतणाऱ्या शाहरुखच्या हातात ‘छोटा पाहुणा’! व्हिडिओ होतोय व्हायरल


Shah Rukh Khan Viral Video : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या अलिबाग फार्महाऊसवर कुटुंबासमवेत सुट्टी घालवून मुंबईत परतला आहे. अभिनेता शाहरुख खान, आज गौरी खान, मुलगी सुहाना, अबरामसोबत मुंबईत परतताना दिसला. यावेळी कुटुंबात एक नवीन सदस्यही आल्याचे पाहायला मिळाले आहे. या नव्या पाहुण्याला खुद्द किंग खानने आपल्या हातात उचलून घेतले होते. हा नवा सदस्य म्हणजे त्यांच्या घराचा पाळीव श्वान. बोटीतून उतरल्यानंतर शाहरुख लगेच आपल्या लाडक्या पिल्लाला हातात घेऊन गाडीत जाऊन बसला. पापाराझी आणि चाहत्यांपासून स्वतःला लपवून ठेवण्यासाठी शाहरुख खानने  लांब काळ्या रंगाच्या जॅकेटने स्वत:ला झाकून घेतलं होतं.



Source link