जेजुरी सोमवती यात्रा : वाहतूक बदलांची अंमलबजावणी

0
1
जेजुरी सोमवती यात्रा : वाहतूक बदलांची अंमलबजावणी

पुणे :- पुरंदर तालुक्यातील महाराष्ट्राच्या कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेसाठी सोमवार, ३० डिसेंबर रोजी जेजुरी येथे मोठ्या उत्साहात यात्रा पार पडणार आहे. यात्रेदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रांताधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत काही वाहतुकीत बदल लागू केले आहेत.

वाहतूक बदलांचे तपशील

जेजुरी पोलीस ठाणे हद्द:
सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुण्याकडे जाणारी वाहने जेजुरी-सासवड मार्गे बंद राहतील. या वाहनांना नीरा-मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुण्याकडे वळवण्यात येईल.
पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतूक बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव मार्गे बारामती किंवा फलटणकडे वळवण्यात येईल.

सुपा पोलीस ठाणे हद्द:
बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे जाणारी वाहतूक मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुण्याकडे वळवण्यात येईल.

सासवड पोलीस ठाणे हद्द:
पुण्याकडून जेजुरीमार्गे फलटण-सातारा जाणारी वाहतूक सासवड-नारायणपूर-कापूरहोळ किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंदकडे वळवण्यात येईल.

हलक्या वाहनांसाठी हे निर्बंध शिथील ठेवण्यात आले असून, यात्रेकरूंना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.