घरी जया आजी वाट पाहतेय! रेखाने अमिताभ यांच्या नातवाला मिठी मारताच नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

0
4
घरी जया आजी वाट पाहतेय! रेखाने अमिताभ यांच्या नातवाला मिठी मारताच नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स


Rekha Video: बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा जिथे जाते तिथे सगळी लाइमलाइट लुटते. प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्या येण्याने चार चाँद लावले जातात. अशातच रेखा बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांच्या 100 व्या वाढदिवसाला पोहोचली. कपूर कुटुंबीयांनी राज कपूर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली. रेखा या कार्यक्रमाला उपस्थित होती. या कार्यक्रमात रेखा अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला भेटली. त्याला मिठी मारली. रेखाचा मिठी मारतानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.



Source link