मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वारावर क्रेन उलटली, तरुणाचे पाय धडपासून वेगळे, वाहतूक ठप्प

0
19
मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वारावर क्रेन उलटली, तरुणाचे पाय धडपासून वेगळे, वाहतूक ठप्प


Bike and Crane Accident in Mumbai : मुंबईत घाटकोपर येथे भीषण अपघात घडला आहे. येथील रमाबाई ब्रीजवर शेजारून जाणाऱ्या दुचाकीवर क्रेन उलटली असून या अपघात दुचाकीचालकाचे दोन्ही पाय हे धडापासून वेगळे झाले आहे. तर क्रेन रस्त्यात आडवी झाल्याने या मार्गावरील वाहतूक ही गेल्या ६ तासांपासून ठप्प झाली आहे. गंभीर जखमी दुचाकीस्वाराची प्रकृती ही गंभीर आहे. त्याला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. या रस्त्यावर पटली झालेली क्रेन व ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सध्या घाटकोपर ब्रीज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.



Source link