
Pushpa 2 Day 2 Collection Worldwide : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २: द रुल’ने रिलीज होताच अनेक सुपरस्टार्सच्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले आहेत. आता अल्लू अर्जुनच्या मास एंटरटेनर चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही जागतिक विक्रम मोडले आहेत. पहिल्याच दिवशी सर्व रेकॉर्ड मोडून आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय सलामीवीर ठरला असून, या चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सुकुमार दिग्दर्शित तेलुगू ॲक्शन ड्रामा हा २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सिक्वेल आहे. पुष्पा राजची जादू केवळ भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळत आहे.








