
viral News : मध्य प्रदेशातील रतलाममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे अल्लाह म्हटल्यामुळे तीन मुलांना अनेक थप्पड मारण्यात आल्या. मारहाण करणाऱ्या तरुणाने मुलांना जबरदस्तीने जय श्रीराम म्हणण्यास सांगितले. मुले जोपर्यंत जय श्रीराम म्हणत नाहीत, तोपर्यंत तरुण त्यांना मारत राहिला. मुले रडत राहिली पण तरुण त्यांना मारायचा थांबला नाही. थप्पड मारूनही त्याचे मन भरले नाही. त्याने चप्पल काढून मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.