Sunday, September 13, 2026
Homeसाताराआंबेडकरी शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने!

आंबेडकरी शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने!

फलटण :- श्वास बहुउद्देशीय विकास संस्था, फलटणची शैक्षणिक उपक्रमांतर्गत मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्सची सुरुवात

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या प्रेरणादायी मंत्राला अनुसरून, श्वास बहुउद्देशीय विकास संस्था, फलटणने एक शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेच्या वतीने गरजू, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स रविवार, 08 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे.

सदर उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन रविवार, 08 डिसेंबर 2024 रोजी नवीन समाज मंदिर, फलटण येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आंबेडकरी विचारधारेला अनुसरून शैक्षणिक क्रांतीसाठी योगदान दिलेल्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार

इंग्लिश भाषेतील कौशल्य वाढवण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी विशेष मार्गदर्शन

समाजातील भीम अनुयायांसाठी एकत्रित शैक्षणिक व्यासपीठ

उपस्थित राहण्याचे आवाहन:

संस्था सर्व विद्यार्थी, पालक वर्ग आणि भीम अनुयायींना या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहे.

संस्थेचे सदस्य:

आयु. मंगेश सावंत

आयु. कपिल काकडे

आयु. चंद्रकांत मोहिते

आयु. मुकेश अहिवळे

आयु. शुभम अहिवळे

कार्यक्रम स्थळ:
नवीन समाज मंदिर, फलटण
तारीख व वेळ:
08 डिसेंबर 2024, रविवार

“शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे, याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्वास संस्था कटिबद्ध आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments