Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

[ad_1]

कसे असणार मेगाब्लॉकचे नियोजन

मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉककाळात सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबतील व पुढे विद्याविहार स्थानकापासून डाऊन मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. तर कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर या गाड्या थांबणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments