क्रांतीसुर्य महात्मा फुले पुण्यतिथी: फलटणमध्ये विविध मान्यवरांकडून अभिवादन

0
1
क्रांतीसुर्य महात्मा फुले पुण्यतिथी: फलटणमध्ये विविध मान्यवरांकडून अभिवादन

फलटण, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त फलटण शहरातील महात्मा फुले चौक येथे त्यांच्या पवित्र स्मृतीस विविध मान्यवरांनी व नागरिकांनी विनम्र अभिवादन केले.

सकाळपासूनच विविध घटकांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नेते मंडळींची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे स्मरण केले.

राजकीय व सामाजिक मान्यवरांचा सहभाग:
कार्यक्रमाला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर आणि स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

सामाजिक एकता आणि प्रेरणेचा संदेश:
महात्मा फुले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी उपस्थित मान्यवरांनी समाज एकत्र आणण्याचा संदेश दिला. महात्मा फुले यांची समाजातील समानता, शिक्षण आणि सुधारणा यांसाठीची भूमिकाही यावेळी अधोरेखित करण्यात आली.