
Chhaava Vs Pushapa Clash Cancle : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘छावा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून चाहते त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. पण, त्यासाठी आता प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. या चित्रपटाची नवी रिलीज आज जाहीर करण्यात आली. यापूर्वी बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची ‘पुष्पा २’शी थेट टक्कर होती. तर, आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. चला जाणून घेऊया या चित्रपटाची नवीन रिलीज डेट काय आहे.