Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रप्रथम स्मृतिदिनानिमित्त मंगल (अक्कासाहेब )भोसले यांना आदरांजली अर्पण; मंगल स्मृती स्तूपाचे लोकार्पण

प्रथम स्मृतिदिनानिमित्त मंगल (अक्कासाहेब )भोसले यांना आदरांजली अर्पण; मंगल स्मृती स्तूपाचे लोकार्पण


फलटण :- माळशिरस तालुक्यातील तांबवे गावात कालकथित (अक्कासाहेब) मंगल बाळासाहेब भोसले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. भन्तेजींनी बौद्ध धम्मानुसार त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली, तसेच मंगल स्मृती स्तूपाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी अकलूजचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. इनामदार यांनी भोसले कुटुंबाशी असलेल्या नात्याची आठवण सांगितली.

१९८० साली भोसले कुटुंबाने मंगल अक्कासाहेबांसाठी प्रथम डॉ. इनामदार यांना भेट दिली होती. यानंतरच्या ४३ वर्षांत त्यांच्या मार्गदर्शनामुळे मंगल अक्कासाहेबांच्या विविध उपचार व शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यांची जगण्याची इच्छा व कुटुंबाचा आधार यामुळे त्यांचे जीवन समाधानाने चालले.

भोसले कुटुंबाचे गॉडफादर म्हणून डॉ. इनामदार यांचे योगदान कौतुकास्पद आहे. अक्कासाहे व बाळासाहेब भोसले यांनी मुलगी मनिषा आणि मुलगा मोहन यांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांचे योगदान नमूद केले. मनिषा शिक्षिका बनल्या तर मोहनने पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केले. भोसले कुटुंबीयांनी अक्कासाहेबांच्या आठवणींप्रमाणे सर्व नातवंडांसाठी सोने खरेदी करून डॉ. इनामदार यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द केले.

भन्तेजींनी या कार्यक्रमात उपस्थितांना धम्मदेशना दिली आणि मंगल अक्कासाहेबांच्या आठवणींना आदरांजली वाहिली .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments