Friday, September 11, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video : अगा एकनाथ मामा, सोयाबीन बत्तीश्श्यानं गेली रे, पाह्य रे...

Viral Video : अगा एकनाथ मामा, सोयाबीन बत्तीश्श्यानं गेली रे, पाह्य रे बापू… सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची व्यथा व्हायरल

[ad_1]

राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन पिकाची कापणी होऊन तयार सोयाबीन शेतकऱ्याच्या घरात दाखल झालेलं आहे. राज्यात यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले आहे. परंतु बाजारात सोयाबीनला योग्य भावच मिळत नसल्याने संपूर्ण राज्यात शेतकरी संतप्त झाले आहे. दिवाळी सण अगदी जवळ आला आहे. सणासुदीची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला हातात लवकर पैसे हवे असल्याने मातीमोल भावाने सोयाबीन विकावे लागत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात दिसून येत आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीन तेलाचे भाव कडाडले. त्यामुळे एकीकडे बाजारात सोयाबीनची विक्री करताना हातात येणारा भाव फक्त ३२०० रुपये तर दुसरीकडे बाजारातून सोयाबीनचा १५ किलो वजनाचा पिंप खरेदी करताना २२०० रुपये मोजावे लागत असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. शेतकऱ्यांची नेमकी ही व्यथा मांडणारा एका तरुण शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हा तरुण शेतकरी हातात सोयाबीन विक्रीची पावती दाखवत ‘अगा एकनाथ मामा, सोयाबीन बत्तीश्श्यानं गेली रे, पाह्य रे बापू…सोयाबीच्या पिपा २२००चा झाला आणि माझे सोयाबीन ३२०० ने गेले गा.. एकनाथ मामा… ओए एकनाथ मामा’ असं उद्देश्यून बोलताना दिसत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून हा तरुण शेतकरी हसत हसतच एकप्रकारे कटू वास्तव मांडताना दिसतोय.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments