Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रवाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी : उलट दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त

वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी : उलट दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त

पुणे : पुणे शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पुणे वाहतूक शाखा सातत्याने प्रयत्नशील आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कडक कारवाईसाठी वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. उलट दिशेने वाहन चालवणाऱ्यांचे वाहन सहा महिन्यांसाठी जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ट्रिपल सीट, मद्यपान करून वाहन चालवणे (ड्रंक अँड ड्राईव्ह) आणि उलट दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.

गेल्या १५ दिवसात वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत:

उलट दिशेने वाहन चालवणारे – २१,२८५

ट्रिपल सीट – २,८७२

मद्यपान करून वाहन चालवणारे – ५७०

जप्त वाहने – २१५

पुणे वाहतूक शाखेमध्ये दोन शिफ्टमध्ये ८५० पोलीस कार्यरत असतात, मात्र बेशिस्त वाहनचालक, अरुंद रस्ते आणि रस्त्यांची दुरवस्था यांमुळे वाहतूक कोंडी दररोज वाढत आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

अवजड वाहनांवर दिवसा बंदी शहरातील विकासकामांसाठी डंपर, कॉक्रीट मिक्सर अशा अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर सुरु असते. अपघातांची संख्या वाढल्याने सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी अशा वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments