Thursday, October 29, 2026
Homeमहाराष्ट्रउलवे येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांना 4 लाख रुपयांच्या लाचेसह...

उलवे येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांना 4 लाख रुपयांच्या लाचेसह अटक

उलवे येथे एनआरआय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 4 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. कदम यांनी इमारत कोसळल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या मदतीसाठी एकूण 50 लाख रुपयांची मागणी केली होती, ज्यापैकी त्यांनी आधीच 14 लाख रुपये स्वीकारले होते. उर्वरित रक्कमेसाठी पुन्हा मागणी केल्यानंतर तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारदाराच्या वडिलांना एक गुंतवणूकदार म्हणून अटक झाल्याने, त्यांच्या नातेवाईकांनी विकासक आणि जागामालकासह त्यांच्यावर अन्यायकारक गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास एनआरआय पोलिस ठाण्याकडून सुरू असताना, कदम यांनी या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितली होती.

मंगळवारी रात्री, उलवे येथील कदम यांच्या घराखाली तक्रारदाराने त्यांना 4 लाख रुपये दिले, त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कदम यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर कदम यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली, ज्यामध्ये 48 लाख रुपयांची रोकड सापडली. तसेच, पोलिस ठाण्यात त्यांच्या कक्षातील कपाटातून 8.7 लाख रुपये मिळाले आहेत. वरिष्ठ निरीक्षकावर झालेल्या या कारवाईनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments