Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रइंदापूरमध्ये परिवर्तन मेळावा; हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळे नेत्यांमध्ये नाराजी

इंदापूरमध्ये परिवर्तन मेळावा; हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळे नेत्यांमध्ये नाराजी

बारामती : इंदापूर तालुक्यात सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी नाकारली जाईल, असा अंदाज होताच हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या मातब्बर नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, आणि कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी पत्रकार परिषदेत पाटील यांच्या पक्षांतराबद्दल खुल्या नाराजीचे स्वर प्रकट केले. शरद पवार गटातील अंतर्गत विरोधामुळे, इंदापूरमधील विधानसभा उमेदवारीच्या निश्चितीसाठी शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी इंदापूर बाजार समितीच्या मैदानात परिवर्तन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात पुढील राजकीय दिशा ठरवली जाणार आहे, ज्याकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments